नो यीस्ट डोनट (no yeast donut recipe in marathi)

#डोनट#सप्टेंबर week3 मी आज पहिल्यांदाच डोनट बनविले. डोनट बनवतांना मनात थोडी भीती वाटत होती कि जमेल कि नाही पण अंकिता मँम आणि कुकपँडच्या माध्यमातून मी प्रयत्न केले खरच खूपच छान झाले.मुलांना ही खूप आवडले.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैद्यात पीठीसाखर बेकिंग सोडा दही दूध व्हॅनिला इसेंस टाकून गोळा घट्टसर भिजविणे. नंतर बटर टाकून भिजविणे. भिजवून ठेवलेला गोळा अर्धा तास झाकून ठेवणे.
- 2
अर्ध्या तासाने पीठाचे एक गोळा घेऊन जाडसर पोळीप्रमाणे लाटणे. एका छोट्या वाटीने गोल कापून घेणे कापलेल्या गोलाच्या मधोमध परत छोटा गोल कापून घेणे. तेल मध्यम आचेवर तापवून घेणे आणि मध्यम आचेवर डोनट तळून घेणे.
- 3
तळून घेतलेले डोनट आपल्या आवडीप्रमाणे चाँकलेट वितळून त्यात डोनट डिप करून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या