जिलबी (jalebi recipe in marathi)

#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2
रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरे
आज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही.

कुकिंग सूचना
- 1
पाक तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये साखर व पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घाला म्हणजे साखरे चे क्रिस्टलाईझ होणार नाही.आता त्यात केशर काड्या घालून एकतारी पेक्षा थोडा कमी असा पाक तयार करुन घ्या.
- 2
एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यात दही व बेकिंग पावडर घाला.आता केशरी पिवळि रंग घालून त्यात थोडे थोडे पाणी घालून थोडी फ्लोईंग कन्सिस्टन्सी होईल असे पीठ भिजवून घ्या.(जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करुन नये.)
- 3
आता पायपींग बॅग मध्ये तयार केलेले मिश्रण भरुन घ्या.कढईत तूप गरम करून त्यात जिलब्या पाडाव्या व मध्यम आचेवर कुरकुरीत जिलबी तळून घ्या
- 4
तळून घेतलेली जिलेबी आता तयार केलेल्या पाकात घाला.५-७ मिनिटांनी जिलबी पाकातून बाहेर काढून घ्यावी.सर्वजिलब्या तयार करुन घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)

टिप्पण्या