कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)

ह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बासमती तांदुळ धूऊन घ्या. 1 तास तसेच ठेवून द्या. मग एक तास झाल्यावर एका चाळण मधे सगळं पाणी निथळून घ्या मग दुसऱ्या टोपात पाणी चांगलं गरम करून घ्या मग एका भांड्यात तूप थोडं गरम करून घ्या मग त्यात सगळे खडे मसाले टाकून घ्या. तांदुळ टाकून परतून घ्या. मग गरम पाणी टाका. मग मीठ टाकून घ्या मग अर्धा भात शिजवून घ्या. मग त्यातला पण पाणी काढून घ्या चाळणी मधे मग भात थंड करायला ठेवा
- 2
कोळंबी ला मॅरीनेट करायला हळद,आगरी मसाला, धणे जीरे पावडर, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस,मीठ हे सर्व एकत्र करून लावून अर्धा तास ठेवा.
- 3
दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत तळून घ्या मग तो एका ताटात काढून घ्या मग त्याचं भांड्यात बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या मग त्यात आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या. मग त्यात टोमॅटो टाकून परतून परतून घ्या.
- 4
मग त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी टाका चांगला परतून घ्या झाकण ठेवा मग थोड्या वेळाने परत परतून घ्या ग्रेव्ही झाली की त्यात कोथींबीर टाकून घ्या मग थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
- 5
आता त्याच भांड्यात लेयर करायची सुरवात करूया कोळंबी अगोदर आहे त्यावर आता भात टाकून घ्या, मग त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना,तूप टाकून थोडा पिवळा रंग, हिरवा रंग टाका झाकण लावा मग एक जाड तवा घ्या मग त्यावर तो बिर्याणीच बंद ठेवूया खाली करपू नये म्हणून 20 मिनिट ठेवा
- 6
मग गॅस बंद करून गरम गरम कोळंबी बिर्याणी तयार
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या