ब्राऊन ब्रेड कचोरी (brown bread kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12
#कचोरी मी ही कचोरी तयार करण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. तसेच ब्रेडक्रम्स लावल्यामुळे ही कचोरी मस्तक रेसिपी लागते. तेव्हा नक्की करून बघा. 🥰
ब्राऊन ब्रेड कचोरी (brown bread kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12
#कचोरी मी ही कचोरी तयार करण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. तसेच ब्रेडक्रम्स लावल्यामुळे ही कचोरी मस्तक रेसिपी लागते. तेव्हा नक्की करून बघा. 🥰
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उकडलेले आलू घेऊन त्याचा किसनीने किस करून घ्यावा. मेयॉनीज व शेजवान चटणी दोन्ही मिक्स करून घ्यावी.
- 2
आता बटाट्याच्या किस मध्ये बारीक चिरलेला कांदा,चिली फ्लेक्स,चाट मसाला,हिरवी मिरची, मेयॉनीज,शेजवान चटणी हे सगळ टाकून मिक्स करून घ्यावे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. हे सारण आपले ब्रेड स्लाईसेस तयार होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
- 3
ब्राऊन ब्रेड च्या साईड च्या कडा चाकूने कापून घ्याव्यात. व मिक्सरमध्ये बारीक करून त्यापासून ब्रेडक्रम्स तयार करून घ्यावे.
- 4
आता एक ब्रेड घेऊन त्याला लाटण्याने लाटून घ्यावे.वाटीने गोल आकार द्यावा. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे असे सगळे ब्रेडचे गोलाकार शेप तयार करून घ्यावेत.
- 5
आता एका ब्रेडच्या पातीवर बटाट्याचे सारण टाकून त्यावर दुसरी पाती ठेवून साईडने गोलाकार तांदळाच्या पिठाचे पाणी लावून पॅक करून घ्यावे.
- 6
आता ही कचोरी तांदळाच्या पिठाच्या तयार केलेल्या पाण्यामध्ये टाकून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलामध्ये तळून घ्यावी.
- 7
आपण तयार केलेले आलूचे सारण फ्रीजमधून बाहेर काढून घ्यावे. ब्रेड स्लाईज वर बटाट्याचे सारण टाकावे. तांदळाचे पिठ घेतले होते त्यामध्ये पाणी टाकून त्याचं पातळ मिश्रण तयार करून घ्यावे.थोडंसं पाणी घेऊन गोलाकार लावून घ्यावे व त्यावर दुसरी स्लाईज् साईडने कडेने दाबून घ्यावी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्याव्यात.
- 8
आता या कचोऱ्या तांदळाचे पिठाचे पाणी केलेल्या मिश्रणामध्ये बुडवून, ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलामध्ये तळून घ्याव्यात.
- 9
अशाच प्रकारे सगळ्या कचोर्या तळून घ्याव्यात.
- 10
आपल्या ब्राऊन ब्रेड क्रिस्पी कचोऱ्या खाण्यासाठी रेडी आहेत.तेव्हा या कचोऱ्या टोमॅटो सॉस,शेजवान चटणी किंवा तळलेली मिरची यांच्यासोबत आस्वाद घ्यावा. करून बघा आणि सांगा कशा झाल्यात
Keywords
Similar Recipes
More Recipes





























टिप्पण्या