गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#GA4 #week3
गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते.

गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)

#GA4 #week3
गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 3मेडीयम साईज गाजर
  2. 1टोमॅटो
  3. 2 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. चवीनुसार मीठ
  6. 2-3हिरवी मिरची
  7. 4-5कढीपत्ता पाने
  8. फोडणीसाठी.
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टीस्पूनमोहरी,
  11. 1/2 टीस्पूनजिरे
  12. 1/2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम गाजर व टोमॅटो स्वच्छ धून घेणे. टोमॅटो बारीक चिरून घेणे. नंतर गाजराचे साली काढून घेणे.व एका प्लेट मध्ये ठेवणे.

  2. 2

    साली काढलेले गाजर खिसणीने खिसुन घेणे. आता एक बाउल घेऊन त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व खिसलेले गाजर घेऊन ते एकत्र करावे.

  3. 3

    नंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर (आवडत असेल तर घालणे.) व दाण्याचा कूट घालून ते सगळे एकत्र करणे.

  4. 4

    नंतर छोट्या कढईत 1 चमचा तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हळद घालावी व त्यात मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालवा. ही तयार केलेली फोडणी वरून त्या गाजर किशिंबिरीत घालावी. अशाप्रकारे मस्त खमंग फोडणी घातली कि कोशिंबीर तयार होते. नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes