शेजवान मसाला डोसा (schezwan masala dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
डोस्याचे बॅटर तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ,उडदाची डाळ,मेथ्या चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवणे. पाच तासांनी डाळ व तांदूळ मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून डोस्याचे बॅटर तयार करून घ्यावे
- 2
बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व हिंग फोडणीला घाला.मोहरी तडतडली की त्यात हळद, हिरव्या मिरच्या, लसून,आलं व कोथिंबीर चे वाटण घालून परतून घ्या.आता त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला, मीठ चवीनुसार घाला व मिक्स करावे.
- 3
सांबार तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुरडाळ शिजवून घ्या.आता एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी कढीपत्ता व कांदा टाकून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. आता त्यात आले लसून पेस्ट, हळद, टॉमेटो, सांबार मसाला व शिजवून धेतलेली डाळ घाला.गरजे प्रमाणे पाणी घालून चांगले उकळू द्यावे.
- 4
आता तव्याला थोडेसे तेल लावून वर थोडे पाणी शिंपडावे म्हणजे डोसा चिकटणार नाही.
- 5
धोडे मिश्रण घालून त्याचा डोसा तयार करा.तयार डोस्यावर शेजवान चटणी घालावी व त्यात भाजी भरावी.चटणी व सांबार बारोबर सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
- दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
- चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
- कुरकुरीत कोळंबी पकोडा (kolambi pakoda recipe in marathi)
- डिलिशिअस हेल्दी नानखटाई (nankhatai recipe in marathi)














टिप्पण्या