ढोकळा (dhokla recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#पश्चिम #गुजरात #ढोकळा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे.
ढोकळयाचे अनेक प्रकार आहे. मी बेसन पीठ वापरून केला आहे.

ढोकळा (dhokla recipe in marathi)

#पश्चिम #गुजरात #ढोकळा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे.
ढोकळयाचे अनेक प्रकार आहे. मी बेसन पीठ वापरून केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1/2 कपदही
  3. 2 टेबलस्पूनरवा
  4. 1/2 कपपाणी. कमी-जास्त लागू शकते
  5. 1/2 टेबलस्पूनआलं लसूण, हिरवी मिरची पेस्ट
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1इनो ची पुडी
  8. फोडणीचे साहित्य
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनजीरे-मोहरी
  11. 4-5कढीपत्त्याची पाने
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. 1 टेबलस्पूनपाणी
  14. थोडी चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका बाऊलमध्ये बेसन पीठ, दोन चमचे रवा, दही, मीठ व लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवावे. जास्त पातळ ही नको व घट्ट ही नको.

  2. 2

    आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगले मिक्स करून घ्यावे. पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    गॅसवर एका भांड्यात पाणी घालून तापत ठेवावे.एक स्टॅन्ड त्यात ठेवावा.

  4. 4

    भिजलेल्या पिठात इनो चे पूर्ण पाकिट एका चमच्यावर ओतून घेऊन,त्यावर थोडेसे पाणी घालावे. बुडबुडे आले की पिठात घालून एका दिशेने 1-2 वेळा हलवून घेणे.

  5. 5

    ढोकळयाच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेणे व मिश्रण त्यात ओतून घ्यावे. ते भांडे पातेल्यात स्टॅन्ड वर ठेवून वर झाकण ठेऊन 20-25 मिनिटे शिजवून घेणे. मधून सुरीने चेक करावे.

  6. 6

    सुरीला पीठ चिकटले नाही, तर ढोकळा तयार झाला.थंड झाल्यावर फोडणी करून घ्यावी.

  7. 7

    छोटया कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की जीरे-मोहरी, कढीपत्त्याची पाने घालून तडतडली की गॅस बंद करावा. त्यात साखर व 1 टेबलस्पून पाणी घालून हलवून घ्यावे. फोडणी ढोकळयावर पसरवून घालावी.एकसारखे तुकडे करून चिंचेची चटणी व तळलेल्या हिरव्या मिरच्या सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes