व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)

#GA4#week3
घरच्या घरी करता येणारा हॉटेलच्या थाटाचा चमचमीत पदार्थ व्हेज मंचुरीयन,,, तर चला मैत्रिणींनो बघूया कशाप्रकारे बनवले जातात ,,,
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
#GA4#week3
घरच्या घरी करता येणारा हॉटेलच्या थाटाचा चमचमीत पदार्थ व्हेज मंचुरीयन,,, तर चला मैत्रिणींनो बघूया कशाप्रकारे बनवले जातात ,,,
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पत्तागोबिचा किस्स करून घ्यावे, आणि नंतर त्या पत्तागोबीचे पाणी पिळुन घ्यावें. आणि नंतर 4 टेबलस्पून मैदा आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोवर घ्यावे.
- 2
त्या नंतर पत्तागोबीच्या किस्स मध्ये वरील सांगितल्या प्रमाणे मैदा आणि कॉर्नफ्लोवर सोबतच त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, आलं लहसून पेस्ट व थोड अजवाईन मिक्स करून त्याचे मिश्रण(कनकेसारखा गोळा) तयार करून घ्यावे. आणि त्याचे बॉल बनवावे.
- 3
आणि नंतर त्या आपण बनवलेल्या मांचुरियन बॉल ला तेलातून खरपुस लालसर रंग येईपर्यंत तळून काढावे.
- 4
आता ग्रेव्ही बनवून घेऊया, त्या करीता आधी एका वाटी मध्ये पाणी घेऊन 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोवर टाकून त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावे, त्या नंतर कढई मध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे,3-4 हिरव्या मिरचे, आणि 10-12 लहसून पाकळ्या बारीक कापून टाकाव्यात आणि ते कॉर्नफ्लोवर चे वाटीभर पाणीे कढईमध्ये सोडावे व त्यात 2 टेबलस्पून रेड चिली सॉस,1 टेबलस्पून डार्क सोयासॉस,1 टेबलस्पून वीेनेगर,1 टेबलस्पून टोमॅटो सॉस,टाकून त्याला फिरवून घ्यावे, नंतर एकदाची उकळी आली की त्यात आपले मंचुरीअन बॉल सोडावे.
- 5
आणि बस्स मग त्याला थोडा 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवावे आणि झाले तर मग,,,,,,, नंतर गरमा गरम वेज मंचूरीअन सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
- दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
- चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
- डिलिशिअस हेल्दी नानखटाई (nankhatai recipe in marathi)
- कुरकुरीत कोळंबी पकोडा (kolambi pakoda recipe in marathi)















टिप्पण्या (4)