चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)

स्मिता जाधव @cook_24266122
चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम २ अंडी फोडून घ्या. त्यामध्ये मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरीगनो आणि मिक्सड् हर्बज् टाकून फेटून घ्या. चवीनुसार मीठ टाकून चांगले एकत्र करून घ्या.
- 2
गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करा. पॅनमध्ये बटर गरम करा. मग त्यावर अंड्याचे मिश्रण गोल पसरवा. आता आमलेट वर २ ब्रेड स्लाईस ठेवा आणि आमलेट लगेच उलटवा.
- 3
एका स्लाईस वर कोथिंबीर घाला. एका ब्रेड वर चीज स्लाईस ठेवा. फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आमलेट फोल्ड करा. दोन्ही बाजूने चांगले शेकवून घ्या.
- 4
मग गरम गरम चीझी आमलेट सँडविच टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13774224













टिप्पण्या