कणिक गुळाचा शिरा (kanik gul sheera recipe in marathi)

#पश्चिम#महाराष्ट्र शिरा किंवा हलवा म्हटलं की किती प्रकार ... त्यातीलच एक पौष्टिक प्रकार, कणिक गुळाचा शिरा. खूप छान लागतो चवीला...आणि साजूक तुपात कणिक खरपूस भाजून घेतली की त्याची चव विचारायलाच नको...नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटणार, ज्यांनी हा शिरा खाल्ला आहे.....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवावी. त्यात तूप टाकावे. नंतर त्यात कणिक टाकून एकत्र करावे.
- 2
तोपर्यंत एका बाजूला भांड्यात पाणी गरम करायला ठेऊन त्यात गुळ टाकून विरघळून घेऊन घ्यावे. कणिक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.त्याचा सुगंध पसरला पाहिजे. त्यात चिमुटभर मीठ व विलायाची पावडर टाका वे.नंतर त्यात गरम गुळाचे केलेले पाणी टाकावे.
- 3
ते चांगले मिक्स करून घ्यावे. त्यावर झाकण ठेऊन 3_4 मिनिट ठेवावे. नंतर त्यात सुक्यामेव्याचे तुकडे टाकून छान एकत्र करावे.
- 4
अशा प्रकारे चविष्ट व पौष्टिक कणिक गुळाचा शिरा तयार झाला. हा शिरा गरमागरम खायला द्यावे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)