कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#पश्चिम #राजस्थान

इतिहास ही केवळ युद्धाची नाही तर विचार, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीच्या प्रवासाची गोष्ट असते. आमचा वाडवळ समाज हे संस्कृतीच्या प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे. इ. स. ११३८ मध्ये प्रताप बिंब राजाने आणि नंतर सुमारे दिडशे वर्षांनी देवगिरीचा युवराज बिंबदेव यादव याने हा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. पश्चिम किनाऱ्याला उत्तर कोकणात आमची संस्कृती (खाद्यसंस्कृतीसह) वसलेली आहे. या दोन्ही राजांनी आपल्या सोबत आणलेली २७ कुळे सोमवंशी क्षत्रिय होती, जी आपली खाद्यसंस्कृती सोबत घेऊन आली होती. आम्ही आपली मुळ संस्कृती सांभाळून पुढे शेती-वाडी करुन इतर खाद्यसंस्कृतींना आम्ही रसद पुरवू लागलो, 'वाडवळ' (वाडी करणारे) ही आमची नवी ओळख बनली. केवळ एका राजापासून दुसऱ्या राजापर्यंतचा नव्हे, हा एका खाद्यसंस्कृतीचा प्रवास आहे.
काही भाषातज्ञांच्या मते, वाडवळी भाषेतील 'अटे-तटे' (इथे-तिथे) हे शब्दोच्चार या प्रवासात मारवाडी भाषेतून आले आहेत. म्हणूनच 'पश्चिम भारत' या थीमच्या निमित्ताने मागे वळून पाहत एक खास राजस्थानी रेसिपी 'ओल्या हळदीची भाजी' बनविली आहे.
बहुगुणी हळद हे आपल्याला लाभलेले नैसर्गिक वरदान आहे. तीचे गुणधर्म सर्वश्रृत आहेत. म्हणून आपण थेट रेसिपी कडे येऊ. गुलाबी थंडीच्या मोसमात ही उष्ण प्रकृतीची भाजी केली जाते. त्यात वापरले जाणारे जिन्नसांत चव, गुणधर्म यासोबत रंग देखील बॅलेंस केले आहेत. ही झटपट होणारी भाजी नाही, आपल्याला तिला वेळ द्यावा लागतो. विविध जिन्नस जमवून एकएका जिन्नसाची योग्य क्रमाने सिद्धता करावी लागते. हळदीचा सुगंध, हाताला चढणारा रंग, आणि पहिल्या घासात मनाचा ठाव घेणारी राजसी चव! आहाहा!!! आणि हे अनुभवायचे तर एकदा ही भाजी नक्की करून पहा...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५-५० मिनिटे
४ जणांसाठी
  • 1/4 किलोओले हळकुंड
  • 1/4 किलोसाजूक तूप
  • 1/4 किलोदही
  • 2कांदे
  • 2टॉमेटो
  • 1लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या
  • 2अक्खे लसूण
  • 1.5 इंचआल्याचा तुकडा
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 1 वाटीब्लांच केलेले मटार
  • 1 टीस्पूनलाल मिरची पूड
  • 1 टीस्पूनधणे पूड
  • 1 टीस्पूनजिरे
  • 1तमालपत्र
  • २३ लवंग
  • 3-4काळीमिरी
  • २-3 वेलची
  • 1-2दालचिनीचे लहान तुकडे
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५-५० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता टॉमेटो, कांदे, मिरची व आले यांचे एकदम बारीक मिश्रण करून घ्यावे. (हे वाटताना अजिबात पाणी घालू नये). आणि सोललेला दीड लसूण पाकळ्या व्यवस्थित ठेचून घ्याव्यात.

    ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता ओली हळद नीट सोलून किसून घ्यावी. नंतर gas वर कढईमध्ये तूप घ्यावे. (सगळे तूप घालू नये, थोडे ठेवावे. आपण ते नंतर घालणार आहोत).
    तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व सगळा खडा मसाला घालून छान चुरचुरू द्यावा.
    आता त्यात किसून घेतलेली हळद घालून घ्यावी. हळद त्या तुपात व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे.

    ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    ५-७ मिनिटे चांगली परतवून घ्यावी. आता त्यात ठेचलेला लसूण घालून परत ७-८ मिनिटे हळद व लसूण चांगले तूप सुटेपर्यंत परतवून घ्यावे. छानपैकी परतवून घेतलेल्या हळदीत तयार केलेले टॉमेटो, कांदे, मिरची व आले यांचे तयार मिश्रण घालून परत ५ मिनिटे मिक्स करून घ्यावे. आता त्यात २ अक्खे लसूण घालून २ मिनिटे ढवळून शिजवून घ्यावे. (हा घातलेला अक्खा लसूण शिजल्यावर अतिशय अप्रतिम लागतो. त्यात ओल्या हळदीची चव जि उतरते त्याला तोडच नाही). आता त्यात आधी शिल्लक ठेवलेले तूप घालावे.

    ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता त्यात दही घालून व्यवस्थित एकत्रित करावे व २ मिनिटे चांगले शिजू द्यावे.(दही घातल्यावर भाजी सतत ढवळत राहावी जेणेकरून दही फाटणार नाही). नंतर त्यात ब्लांच केलेले मटार घालावेत. आणि एक उकळी काढून घ्यावी. ओल्या हळदीची भाजी तय्यार!!!

    ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    पारंपारिक पद्धतीनुसार ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. फक्त ही भाजी बनवताना काही पथ्ये लक्षात ठेवावीत.
    हळदीची भाजी करताना त्यात अजिबात पाणी घालायचे नाही. ही भाजी पूर्णतः तुपातच शिजवायची असते, कारण हळद ही अतिशय उष्ण प्रकृतीची असल्याने तिची उष्णता नियंत्रित करणे आवश्यक असते. याच कारणासाठी आपण या भाजीत दहीदेखील वापरतो.
    ही भाजी खूप निगुतीने करावी लागते आणि पूर्ण वेळ हि भाजी घाटत राहावी, नाहीतर हळद खाली लागू शकते.

    ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
21 ऑक्टोबर 2020 12:57 रोजी
virar

टिप्पण्या (8)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
20 फेब्रुवारी 2021 11:18
छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. लोणी (butter recipe in marathi)
  2. लाल भोपळ्याची बाखर भाजी (lal bhoplyachi bakhar bhaji recipe in marathi)
  3. वरमिसिली हलवा (sevai halwa recipe in marathi)
  4. राजगिरा पिठाची भजी (rajgira pithachi bhaji recipe in marathi)
  5. जलेबी (jalebi recipe in marathi)
  1. दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
  2. साबुदाणा खिचडी/ साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)
  3. चना चाट (chana chat recipe in marathi)
  4. चीकपी फलाफेल छोले (cheakpea falafal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13874111
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close