बाजरी मूगडाळ खिचडी (bajari moongdal khichadi recipe in marathi)

बाजरी मूगडाळ खिचडी (bajari moongdal khichadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बाजरी व मुग डाळ चार ते पाच तास भिजू द्यावे.
बाजरी भीजल्यानंतर त्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे भरडून घ्यावे.
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर एका कुकरमध्ये तेल घ्यावे गॅसवर ठेवून तेल तापू द्यावे.
तेल तापल्यानंतर त्यात जीरे तडतडू द्यावे व त्यात कढीपत्त्याची पाने व कांदा ॲड करावे.
कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट ॲड करावे. - 2
दोन ते तीन मिनिट आले-लसूण पेस्ट शिजल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करावे.
सोबतच तिखट, हळद, गरम मसाला, धने पूड व मीठ घालावे.
दोन मिनिटे टोमॅटो ह्या मिश्रणात शिजू द्यावे.
त्यात बाजरी व मूग डाळ ॲड करावे.
तेलावर बाजरी व मूग डाळ पाच ते सहा मिनिटे शिजू द्यावे. - 3
पाच ते सहा मिनिट झाकून शिजल्यानंतर त्यात दुप्पट प्रमाणात पाणी ॲड करावे.
व उकळी आल्यानंतर कुकर चे झाकण लावून कुकर दोन ते तीन शिट्ट्या शिजू द्यावे.
कुकर बंद करावे व कुकर थंड झाल्यानंतर बाजरीची आसट आसट खिचडी साजूक तुपाबरोबर सर्व करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या