स्क्रम्बल्ड एग, बटर टोस्ट आणि संत्रा ज्युस (egg butter toast recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week7 ब्रेकफास्ट म्हटलं की खूप विचारात पडतो। इतके ऑपशन्स असतात आणि नेहमी काहीतरी वेगळं खायची इच्छा होते। म्हणून आज ब्रेकफास्ट मधे बनवले स्क्रम्बल्ड एग, बटर टोस्ट आणि संत्रा ज्युस।

टीप: दूध च्या जागी घरी फ्रेश क्रीम असेल तर फार उत्तम, त्याने टेस्ट आणि texture अजून चांगलं येते। गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा/ इंडकशन असल्यास 400W।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 6-7अंडे
  2. 40 ग्रॅम बटर
  3. 60 मिली दूध
  4. 1/2 चमचामिरे पूड
  5. 1/4 चमचाऑरेंगानो चिली फ्लेक्स मिक्स
  6. 1-2 चमचेमीठ
  7. 1/2 वाटीहिरवा कांदा
  8. 7-8संत्रा
  9. 6ब्रेड स्लाइस

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला एका पॅन मधे अंडे फोडून घ्यावेत। आणि मग पॅन गरम करायला ठेवावा।

  2. 2

    आता अंडे मिक्स करावे आणि त्यात बटर घालावे आणि सतत मिक्स करत रहावे। आता हे बनवताना एक लक्षात घ्यावे, 2 मिन गॅस वर आणि 1 मिनिट पॅन घाली घेऊन मिक्स करावे। सतत गॅस वर केल्यास texture बरोबर येणार नाही। आता एक सायकल झाल्यावर त्यात दूध घालावे आणि परत मिक्स करून सायकल रिपीट करावी।

  3. 3

    आता हळू हळू मिश्रण घट्ट होत असताना त्यात मीठ घालावे। अजून 2 मिनिटे मिक्स करून गॅस बंद करावा। आता त्यात मिरे पूड आणि बारीक हिरवा कांदा घालावा।

  4. 4

    पुढे ब्रेड ला बटर लावून गॅस वर गरम करून घ्यावे। आणि संत्रा चा ज्युस काढून घ्यावा। तुमचा टेस्टी यम्मी ब्रेकफास्ट रेडी। सर्व्ह करताना स्क्रम्बल्ड एग वर थोडा ऑरेंगानो घालावा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
रोजी

Similar Recipes