कॉलीफ्लॉवर 65 (cauliflower / Gobi 65 recipe in marathi)

कॉलीफ्लॉवर 65 (cauliflower / Gobi 65 recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करून उकळीच्या पाण्यामध्ये दहा मिनीट ठेवावे.दुसरीकडे एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ, मैदा व कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये लाल मिरची +आले +लसूण पेस्ट,थोडेसे मीठ व एक टेबलस्पून तेल घालून एकत्र करावे व त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालावे.
- 2
या मिश्रणाचे भज्या सारखे पीठ भिजवून घ्यावे.आता फ्लॉवरचे तुकडे पाण्यातून काढून घ्यावे.त्यावर एक टीस्पून कॉर्नफ्लोअर,आले-लसूण पेस्ट, थोडे मीठ, गरम मसाला घालून पाच मिनिट मॅरिनेट करावे व पाच मिनिटानंतर हे तुकडे मैदा कॉर्नफ्लोअर च्या बॅटर मध्ये ॲड करावेत.
- 3
आता कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आंचेवर साधारण दोन ते तीन मिनिट अर्धवट तळून घ्यावेत.अशाप्रकारे सर्व तळल्यानंतर सर्व्ह करण्यापूर्वी मोठ्या आंचेवर पुन्हा खरपूस (डबल फ्राय) तळून घ्यावेत.
- 4
एखाद्या सॉस किंवा डीप सोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या (4)