पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#उत्तर
#उत्तर प्रदेश
कढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा.

पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)

#उत्तर
#उत्तर प्रदेश
कढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरताक किंवा 1कप दही
  2. 3 टेबलस्पूनबेसन कढी साठी
  3. 1/4 टीस्पूनहिंग
  4. 1 टीस्पूनमेथीदाणे
  5. 4/5कढीपत्ता
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. (पकोडा साठी) भजीसाठी👇
  9. 1/2 कपचण्याचे पीठ
  10. 1/2कांदा
  11. 1 टीस्पूनकिसलेले आले
  12. 1 टीस्पूनहिरवी मिरची
  13. 1 टीस्पूनओवा
  14. 1/2 कपकोथिंबीर
  15. 200 ग्रॅमतेल

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    कोथिंबीर, आल,मिरची चिरून घेणे

  2. 2

    दही असेल तर ताक करणे व त्यात चण्याचे पीठ चांगले मिसळून घेणे

  3. 3

    कढईत 2 टेबलस्पून तेल घाला त्यात हिंग व मेथी दाणे घाला छान वास आला कि कढीपत्ता, लाल तिखट, हळद घाला व पटकन थोडे पाणी घाला म्हणजे लाल तिखट, हळद जळणार नाही.दोन मिनिटे उकळू द्या व त्यात पीठ घातलेले ताक घाला.कढी साधारण 30मिनिटे उकळत ठेवा मधे मधे ढवळत रहा जर घट्ट वाटली तर पाणी घाला.भजी घातली कि कढी जाड होते म्हणून पातळच करा.

  4. 4

    1/2चण्याचे पीठ घ्या त्यात थोडे पाणी व 1 टीस्पून तेल घाला थोडे फेटा नि मग कोथिंबीर, कांदा,ओवा,आल,मिरची घालून छान मिसळून घ्या जर पीठ कमी वाटले तर थोडे घाला मीठ घाला नि भजी छोटी छोटी तळून घ्या.

  5. 5

    तळलेली भजी (पकोडे) कढीत सोडा नि गरम गरम चपाती,भात कशा बरोबरही खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes