बिट,गाजर डायट सुप (beet gajar diet soup recipe in marathi)

Vaishnavi Dodke @cook_26499311
वजन कमी करण्यासाठी हे सूप करून पाहिलं खूप छान दिसत आहे
बिट,गाजर डायट सुप (beet gajar diet soup recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी हे सूप करून पाहिलं खूप छान दिसत आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कुकरमध्ये अगदी थोडे तूप किंवा बटर टाकून त्यात तेजपत्ता परतून घ्यावे व नंतर त्यात,बिट,गाजर, टोमॅटो, मटार दाणे, मिरची तुकडे टाकून थोडावेळ परतून घ्यावे.नंतर त्यात अगदी थोडे पाणी घालून कुकरमध्ये शिटी लावून शिजवून घ्यावे.
- 2
नंतर ते गाळून पाणी बाजूला काढून ठेवावेत.नंतर ते तेज पत्ता काढून इतर सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 3
नंतर एका कढईमध्ये किंवा इतर कोणत्याही भांड्यात बटर किंवा तूपगरम करून त्यात जिरे परतून घ्यावे व वाटलेले मिश्रण टाकून आपल्या आवडीप्रमाणे गाळलेले पाणी टाकून पातळ किंवा घट्ट करावे. नंतर एक चांगली उकळी काढावी व आवडत असेल तर कोथिंबीर टाकावी गरमागरम सूप तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14175769









टिप्पण्या