पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.
- 2
लसून सोलून घ्यावे. कोथिंबिर, लसून व आलं मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
- 3
डाळ व पालक कुकर मधून शिजवून घ्यावे.
- 4
कांदा व टोमॉटो बारीक चिरून घ्यावा. कुकर थंड झाले की गॅस वर फोडणी करीता गंज ठेवावा. त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात तिखट, हळद जीरे पुड व धने पुड टाकावी. 2 मिनिट शिजवून घ्यावे. टोमॉटो टाकून पाच मिनिट शिजवून घ्यावे. डाळ घोटून घ्यावी. ही डाळ फोडणीत टाकावी व चांगले मिक्स करावे.
- 5
गरम मसाला टाकून या दाळीला एक उकळी येवू द्यावी. कोथिंबिर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. वर कोथिंबिर टाकावी. गरम गरम भातासोबत सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14191085











टिप्पण्या