चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चवळी स्वच्छ धुऊन 5-6 तास भिजत घालावी. त्यानंतर ती उकडून घ्यावी. म्हणजे शिजवायला त्रास होत नाही.
- 2
आता गॅस सुरू करून गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. जीरे मोहरी, कांदा, कढीपत्ता टाकावा. परतून घेतल्यावर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, तिखट, धणे पूड, मसाला टाकून एकत्र करावे. चांगले परतून घेतल्यावर, टोमॅटो टाकावे.
- 3
मिक्स केल्यानंतर, त्यात, उकडून घेतलेली चवळी टाकावी. मीठ टाकावे.
- 4
मिक्स करून थोडेसे पाणी टाकावे. कारण आधीच उकडून घेतल्यामुळे जास्त पाण्याची गरज पडत नाही. झाकण ठेवून, 5 मिनिट शिजवावे.
- 5
झाकण काढून चिरलेली कोथिंबीर टाकावी. व मिक्स करून घ्यावे. चवदार आणि चटकदार चवळीची उसळ गरमागरम खाण्यास तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- ओरिओ चाॅकलेट पेस्ट्री (oero chocolate pastry recipe in marathi)
- चिया..पपई पुडिंग (chia papai pudding recipe in marathi)
- कलिंगड मॉकटेल (kalinggad moktail recipe in marathi)
- लिट्टी चोखा (lithi chokha recipe in marathi)
- मिक्स वेजी रवा चीज टोस्ट सॅन्डविच (mix veggie rava cheese toast sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14359132















टिप्पण्या