पोह्याचा पुलाव (pohyancha pulav recipe in marathi)
#GA4 Week 19
गोल्डन ॲप्रन ४ मधील पुलाव हा किवर्ड शोधून मी ही रेसिपी बनविली आहे..
मुलासाठी किंवा मुलीसाठी स्थळ बघताना पत्रिकेतले गुण जुळले की हमखास बघण्याचा कार्यक्रम ठरवला जातो....म्हणजेच कांदे पोह्याचा कार्यक्रम....अगदी पूर्वापार चालत आलेल्या बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहेच का केले जातात, हे न उलगडणारं कोडं असावं बहुदा....असो....
पण पोह्यापासून चिवडा, वडे, कटलेट इ.....अनेक पदार्थ बनविले जातात....
पण पोह्याचा पुलाव केला आहे का हो कधी.....नाही म्हणताय.....अहो अगदी सोपा आहे....चला बघूया कसा बनवायचा पोह्याचा पुलाव..

कुकिंग सूचना
- 1
पोहे चाळून थोडे भिजवून घ्या.
- 2
बटाटे उकडून घ्या. कांदे, फरसबी, सिमला मिरची, गाजर या सर्व भाज्या उभ्या चिरा आणि मटार सोबत कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्या.
- 3
आता कढईमध्ये ४ टेबलस्पून तेल घालून मोहरी - जि-याची फोडणी करा आणि सर्वप्रथम कांदा परतून घ्या. कांदा गुलाबीसर परतून घेतला की त्यामध्ये सर्व वाफवलेल्या भाज्या, बटाटे आणि मटार हे सर्व पदार्थ मिक्स करून त्यामध्ये जिरेपूड, मिरेपूड, दालचिनी पावडर, धणेपूड, लवंग पावडर, काजू, बेदाणे, तिखट, मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून घ्या.
- 4
आता परतून घेतलेल्या सर्व भाज्या भिजवलेला पोह्यावर घाला आणि मिक्स करून घ्या. पोह्यावर चवीनुसार मीठ घाला. आधी भाज्यांमध्ये मीठ घातले असल्याने आपल्या आवडीनुसार चव बघून मीठ घाला. असा हा पोह्याचा पुलाव सर्व्हिंग डिशमध्ये घेऊन सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या