दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)

दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी स्वच्छ धुवून घ्यावी. दुधी भोपळा किसून घ्यावा.त्यानंतर दुधी भोपळ्याचे पाणी काढून घ्यावे.
- 2
दुधी भोपळ्याचा कीस मध्ये गाजराचा किस, पानकोबीचा कीस, स्वीट कॉर्न,पातीचा कांदा,चिरलेली कोथिंबीर,हिरवी मिरची,धने पावडर, जीरे पावडर,तिखट, हळद,मीठ,तीळ,ओवा टाकावा. एक टेबलस्पून तेलाचे मोहन टाकावे. नंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ,बेसन,भाजणीचे पीठ टाकावे.आणि भज्यासारखे पीठ तयार करावे.
- 3
कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर दुधिचे पकोडे टाकावे. पकोडे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत.
- 4
सर्व पकोडे तळून झाल्यावर टिश्यू पेपर वर सौक करायला ठेवावे.दुधी भोपळ्याचे पकोडे सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या