फिश फींगर फ्राय (fish finger fry recipe in marathi)

फिश फींगर फ्राय (fish finger fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मासे स्वच्छ धुवून घ्यावे. मासे फिंगर च्या आकाराचे चिरून घ्यावे.आणि काटे काढून घ्यावे.
- 2
माश्या मध्ये तिखट,मीठ,हळद,आमचूर पावडर,धने पावडर,जीरे पावडर,लसूण अद्रक पेस्ट,पेरी पेरी मसाला,मिरे पूड,चिकन मसाला टाकून मॅरीनेट करावे. आणि अर्धा तास बाजुला ठेवावे.बटर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
- 3
अंडे छान फेटून घ्यावे.एका प्लेट मध्ये मैदा,कॉर्न फ्लोअर आणि बेसन काढून घ्यावे. बारीक केलेला बटरचा चुरा,फेटलेले अंडे,आणि मैदा,बेसन,कॉर्न फ्लोअर एकत्र ठेवावे.
- 4
मासे प्रथम मैदा,कॉर्न फ्लोअर आणि बेसन च्या पीठा मध्ये घोळून घ्यावे.नंतर फेटलेले अंड्या मध्ये आणि बटर मध्ये घोळून घ्यावे.
- 5
कढई मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर एक एक मासे टाकावे.आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळावे. अश्या प्रकारे सर्व फिश फिंगर तळून घ्यावे.
- 6
फिश फिंगर तळून झाल्यावर टिश्यू पेपर वर सोक करायला ठेवावे. आणि प्लेट मध्ये काढून घ्यावे.
- 7
फिश फिंगर कुरकुरीत झालेले आहे. कुरकुरीत फिश फिंगर प्लेट मध्ये सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या