शाही टोस्ट (Shahi toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधामध्ये अर्धी वाटी साखर, कस्टर्ड पावडर टाकून एकत्रित करा आणि गॅस वर उकळत ठेवा. मधून मधून कालवत रहा.
- 2
दूध थोडं घट्ट झाल्यावर त्यात बदाम पिस्ता जाडसर कुटून टाका. मिश्रण थोडं घट्ट करा व केशर काड्या आणि थोडं वॅनिला एसेन्स टाकून थंड होवू दया.
- 3
एका पातेल्यात 1/2 ग्लास पाणी घेऊन त्यात 1 कप साखर टाका व थोडं चिकटसर होईपर्यंत उकळत ठेवा. नंतर त्यात थोडा वॅनिला एसेन्स टाका.
- 4
एका पॅन मध्ये थोडं थोडं साजूक तूप घेऊन टोस्ट शॉलो फ्राय करून घ्या. (तुम्ही dip fry पण करू शकतात) सर्व टोस्ट गुलाबी भाजून घ्या.
- 5
गुलाबी भाजून घेतलेले टोस्ट शुगर सिरप मध्ये हलकेच बुडवून साईडला ठेवा.त्यावर बनवून घेतलेली रबडी टाका आणि ड्रायफ्रूट ने सजवून घ्या. ही स्वीट डिश खूप छान लागते. आयत्यावेळी पाहुणे आल्यावर बनवल्यास सर्वाना खूप आवडेल. काहीतरी नवीन गोड होईल
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14604900
















टिप्पण्या (2)