मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लानर
दूसरी रेसिपी- घाई-गडबडीत पटकन तयार
होणारी मुगाच्या डाळीची भाजी

मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लानर
दूसरी रेसिपी- घाई-गडबडीत पटकन तयार
होणारी मुगाच्या डाळीची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. १ कपमुग डाळ
  2. तेल
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 1हि.मिरची
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पून लाल तिखट
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनमोहरी
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 1/2 टीस्पूनहिंग
  13. २- २.५ कप गरम पाणी
  14. कोथिंबीर बारीक चिरलेली गार्निशिंगसाठी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घ्या.

  2. 2

    नंतर कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  3. 3

    आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली की जीरे, हिंग हिरवी मिरची व आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या,कच्चेपणा जाऊ द्या.

  4. 4

    आता त्यात कांदा घालून नीट शिजवून घ्या. नंतर टोमॅटो घालून मिक्स करून थोडा परतून घ्यावा. आता त्यात हळद, तिखट व गरम मसाला घालून नीट मिक्स करावे.

  5. 5

    आता त्यात मुग डाळ, गरम पाणी, चवीनुसार मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. आणि झाकण ठेवून चांगली शिजवून घ्या

  6. 6

    भाजी मध्ये मध्ये झाकण काढून ढवळून घ्या, मला २.५ कप पाणी पुरवले (आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करावे)

  7. 7

    साधारणतः १०-१५ मिनिटे लागतात. पाणी आटले की डाळीचा दाणा हाताने दाबून बघा.
    अशा रीतीने आपली मुगाच्या डाळीची भाजी तयार आहे. वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes