कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पनीर धुवून घ्यावे व त्याचे तुकडे कापून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर पनीर तळून घ्यावेत. शिमला मिरची चिरून फ्राय करून घ्यावी.
- 2
मिरची व टोमॉटो बारीक चिरून त्याची पेस्ट तयार करावी. कढई मध्ये दोन मोठे चमचे तेल घालावे व जीरे तळतळू द्यावेत. त्यानंतर त्यात आलं लसून पेस्ट टाकावी व पाच मिनीटे परतून घ्यावे. तिखट हळद व गरम मसाला टाकून पुन्हा पाच मिनीटे शिजवून घ्यावे. टोमॉटो प्युरी टाकून चांगले मिक्स करावे व शिजवून घ्यावे. आवश्यकते नूसार पाणी घालावे.
- 3
आता यात तळलेले पनीर चे तुकडे टाकावेत, व मिक्स करून घ्यावे. चवीनूसार मीठ टाकावे. वर कोथिंबिर पेरावी. आपले कढाई पनीर तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14623523








टिप्पण्या