सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात.

सांबर वडी (sambar wadi recipe in marathi)

#GR #सांबर वडी ही विदर्भातील लोकप्रिय आहे. हिवाळ्यात कोथिंबीरिचे उत्पन्न खूप येते.त्यामुळे कोथिंबीर चांगली मिळते.ही वडी स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्यासाठी बनवतात. ही निरनिराळ्या प्रकारे केली जाते.विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4-5 व्यक्तींसाठी
  1. आवरणासाठी लागणारे साहित्य
  2. 2 कपबेसन
  3. 1/4 कपमैदा
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टेबलस्पूनहळद
  6. 1/4 टेबलस्पूनहिंग
  7. 1/2 टेबलस्पूनओवा
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. सारणासाठी लागणारे साहित्य
  11. 2 कपकोथिंबीर
  12. 1/2 कपकिसलेले सुके खोबरे
  13. 2 टेबलस्पूनदाण्याचा कुट
  14. 2 टेबलस्पूनतीळ
  15. 2 टेबलस्पूनखसखस
  16. 1 टेबलस्पूनजिरें पावडर
  17. 1 टेबलस्पूनधने पावडर
  18. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  19. 3-4बारीक चिरलेली हिरवी मिरची
  20. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  21. 1 टेबलस्पूनजिरें
  22. 2 टेबलस्पूनकसुरी मेथी
  23. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  24. 8-10काजू
  25. 1 टेबलस्पूनमीठ
  26. 1 टेबलस्पूनसाखर
  27. 2 टेबलस्पूनतेल
  28. 2 टेबलस्पूनचिंच गुळाची चटणी
  29. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    कोथिंबीर स्वच्छ धुऊन. सुकवून बारीक चिरुन घ्यावी

  2. 2

    परातीत बेसनाचे पीठ व मैदा घेऊन त्यात तिखट, हळद, मीठ, ओवा आणि हिंग घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. त्यात तेल गरम करून ओतावे. हाताने चोळून तेल पिठाला लावून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून पिठाचा पुरीला मळतो तेव्हढ घट्ट मळावे. झाकून ठेवावे.

  3. 3

    गॅसवर पॅन मध्ये दोन टेबलस्पून तेल घेऊन मंद आचेवर त्यात हिरवी मिरची, जिरें, हिंग, तीळ, खसखस, लाल तिखट, धने आणि जिरें पावडर घालून परतुन घ्यावे. त्यात आले लसूण पेस्ट (आवडत असेल तर), काजूचे तुकडे, दाण्याचा कुट, सुके खोबरे, कसुरी मेथी, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून सर्व मिक्स करून कोथिंबीर घालावी. दोन मिनिटे परतुन सारण गॅसवरून उतरवून ठेवावे.

  4. 4

    मळलेल्या बेसन पिठाचे छोटे गोळे करून घ्यावे.

  5. 5

    बेसन पिठाचा एक गोळा घेऊन मैद्यात घोळून त्याची पातळ पारी लाटून घ्यावी. त्यावर चिंच गुळाची चटणी लावावी. चटणी ऐवजी दही घोटून लावतात किंवा मसाल्याचे पाणी करून लावतात.

  6. 6

    लाटलेल्या पारिवर कोथिंबीरीचे सारण ठेवून ते फोटोत दाखविल्या प्रमाणे बंद करून घ्यावे.

  7. 7

    गॅसवर कढईत तेल घेऊन मध्यम आचेवर सांबर वडी गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्यावी.

  8. 8

    सांबर वडी तयार सॉस व चटणी बरोबर सर्व्ह करा. खुसखुशीत व झणझणित सांबर वडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes