डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खारका फोडून बी काढून मीक्सर मधून काढून घेतली. डिंक थोडं तुप लावून थोडा-थोडा करून मायक्रो ओव्हन मध्ये २ मी नीट गरम करून काढून घेतला. तो छान फुलून येतो. तळायची गरज नाही.
- 2
डिंक मीक्सर मधून काढून घेतला.काजू,बदाम,पीस्ता, आक्रोड, गोडंबी, मखाणा सर्व मिक्सरमधून काढून घेतले.सर्व खारीक पूड मधे घातले.
- 3
खोबरं, खसखस भाजून ते बारीक करून घातले. तसेच कणिक, उडीद पीठ,नाचणी पीठ, पण तुपावर खमंग परतून त्यात मिक्स केले.
- 4
आता सर्व डिंक व खारकेच्या मिश्रणात मिक्स केले. वेलची, जायफळ, सुंठ ह्यांची मीक्सरवर पुड करुन त्यात मीक्स केले. सर्व मिक्स करून झाल्यावर तुप गरम करून गुळ विरघळून घेतला.व तो मिश्रणात घालून मिक्स करून घेतले.
- 5
आता त्या मिश्रणाचे लाडू वळून सर्व्ह केले. हे लाडू अत्यंत पौष्टिक, शक्तिवर्धक, टेस्टी असून साखरेचा वापर केला नाही.तसेच ड्राय फ्रूट बरोबर पीठ व मखाणा ह्यांचाही वापर केल्यामुळे हेल्दी आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
- "खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)
- पंजाबी बटर तडका मॅगी मसाला (punjabi butter tadka maggi masala recipe in marathi)
- केशर रसगुल्ला (KESAR RASGULLA RECIPE IN MARATHI)
- लसुणी मेथी (lasuni methi recipe in marathi)

















टिप्पण्या