उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)

#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ खायला छान वाटतात.म्हणून आज उपवासाचे डोसे करत आहे. अगदी कमी सामग्री मध्ये कमी वेळात होणारा हा डोसा आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा आणि भगर वाटी मध्ये काढून घ्यावी
- 2
साबुदाणा मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्यावा.भगार सुद्धा वाटून घ्यावी.साबुदाणा आणि भगर एकत्र वाटून घ्यावी.त्यामध्ये मिरची,जीरे, मिर पावडर,जीरे पावडर एक उकडलेला बटाटा,दही टाकून एकजीव वाटून घ्यावे
- 3
मिश्रण छान एकजीव वाटून घ्यावे.त्यामध्ये वेळेवर मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा टाकावा.
- 4
आता नॉन स्टीक तवा गॅस वर ठेवावा. तवा हाय फ्लेम वर गरम करावा. आणि चोहो बाजूने तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर गोल पळीने डोसा टाकावा.डोस्याला छान जाळी येते. एक झाकण झाकून ठेवावे. त्यानंतर झाकण काढून तेल टाकावे. डोसा मध्यम ते कमी आचेवर शिजवावे. दोन्ही बाजूने लालसर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा.
- 5
डोसा झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावा. शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी करून घ्यावी.
- 6
अश्या प्रकारे सर्व डोसे करून घ्यावे. कमी वेळात कुरकुरीत आणि जाळीदार डोसे तयार होतात चटणी आणि बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या