मटण मसाला सुका (Mutton masala sukha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका कुकर मध्ये कांदा चिरून फोडणीला घालावा व परतून घ्यावा त्यामध्ये आले लसूण पेस्ट परतून घ्यावी नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या मटण टाकावे.
- 2
परतून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकावे व चार ते पाच शिट्या काढून घ्याव्यात. व थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
- 3
आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये सुख खोबऱ्याचे काप टाकावे व ते ही परतून घ्यावे त्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंगा काळीमिरी परतून घ्यावे व शेवटी सर्व लालसर झाल्यावर त्यामध्ये तीळ जावे व तेही परतून घ्यावे मिक्सरच्या भांड्यात काढावे त्यामध्ये टोमॅटोमिक्सरच्या भांड्यात काढावे त्यामध्ये टोमॅटो आलं लसुन टाकावे.
- 4
पेस्ट तयार करून घ्यावी त्यामध्ये कोथिंबीर टाकून पुन्हा बारीक पेस्ट करावी.
- 5
आता आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकावा व तो गुलाबीसर परतून घ्यावा. आता त्यामध्ये सर्व सुखे मसाले टाकावे. परतून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये वाटण टाकावे व व्यवस्थित परतून घ्यावे आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतावे
- 6
तेल सुटलं की त्यामध्ये मटणाचा फोडी टाकाव्या. व परतून घ्यावे गरज असल्यास मटणाचा जे पाणी येतं तेच टाकावे दुसरे पाणी टाकू नये. वरून कोथंबीर टाकावी अशाप्रकारे तयार होईल आपला मटण मसाला सुखं
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या