निलंगा राईस (Nilanga rice recipe in marathi)

#KS5
मराठवाड्यात लातूर पासून जवळच निलंगा हे
छोट शहर आहे तेथे हा राईस खूप प्रसिद्ध आहे. लातूर , निलंगा आणि आजूबाजूच्या गावात ही हा राईस बनवला जातो. प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोणी या मध्ये मसूर डाळ घालतो तर कोणी मुगडाळ तर कोणी भाज्या पण घालतात. याला आलू भात , मसाला भात तर काही ठिकाणी खिचडी आसे ही म्हणतात. चवीला एकदम मस्त लागतो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मसूर डाळ, तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या. सर्व भाज्या कट करून घ्या.
- 2
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, पूड, कडीपत्ता, आद्रक लसूण घालून परतावे.नंतर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो घालून थोडे परतून घ्या.
- 3
त्यात हळद,लाल तिखट,काळ तिखट, हळद, कोथिंबीर घालून मिक्स करा. कट केलेला बटाटा, कच्चे शेंगदाणे घालून मिक्स करा.
- 4
नंतर धुतलेले तांदूळ, डाळ घालून मिक्स करा.मीठ घालावे.
- 5
गरजेनुसार पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. हा भात खुप मोकळा किंवा खुप चिकट ही नसतो.
- 6
गरमागरम भात सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
- लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
- खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)
- करवंदाची चटणी (karvandachi chutney recipe in marathi)
- मराठवाडा स्पेशल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

टिप्पण्या