लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS5
#मराठवाठा_रेसिपीज
लातूरमधील निलंगा या छोट्याश्या गावामधे हा भात खूप प्रसिद्ध आहे.
चवीला फारच चमचमीत लागतो , आणि यामधे फ्रेश मेथीची चव अप्रतिम लागते.
मेथीमुळे हा भात तयार झाल्यावर छान सुगंध दरवळतो...😋😋😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)

#KS5
#मराठवाठा_रेसिपीज
लातूरमधील निलंगा या छोट्याश्या गावामधे हा भात खूप प्रसिद्ध आहे.
चवीला फारच चमचमीत लागतो , आणि यामधे फ्रेश मेथीची चव अप्रतिम लागते.
मेथीमुळे हा भात तयार झाल्यावर छान सुगंध दरवळतो...😋😋😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
४ सर्व्हिंग्ज
  1. 2कप कोलम तांदूळ
  2. 1/2 कपकप मसूर डाळ
  3. 1/2 कपमेथी
  4. 1/2 कपशेंगदाणे
  5. 1कांदा चिरलेला
  6. 1टोमॅटो चिरलेला
  7. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. मीठ चवीनुसार
  13. जीरे ,मोहरी,हिंग कडीपत्ता
  14. कोथिंबीर
  15. पाणी गरजेनुसार
  16. तेल
  17. 1 टेबलस्पूनतूप
  18. 2हिरव्या मिरच्या चिरून
  19. 1 टेबलस्पूनआलं लसूण क्रश
  20. 1बटाट्याच्या फोडी

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    तांदूळ डाळ स्वच्छ धुऊन घ्या.तांदूळ भिजत घालायचे नाहीत.फक्त धुऊन घ्यायचे.

  2. 2

    कुकरमध्ये तेल गरम करून जीरे,मोहरी,हिंग,हिरवी मिरची, कडिपत्ता यांची खमंग फोडणी तयार करा‌. नंतर शेंगदाणे घालून परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात वरील सर्व मसाले,मीठ,मेथघ घालून छान परतून घ्या.

  4. 4

    नंतर त्यात धुतलेले तांदूळ,डाळ,बटाटे अंदाजे पाणी घालून छान मिक्स करा. शेवटी त्यात तूप,कसूरी मेथी,तूप घालून छान मिक्स करा. कुकरचं झाकण लावून ३ शिट्ट्या द्या.

  5. 5

    कुकर थंड झाल्यावर भात छान मिक्स करून घ्या‌. आपला निलंगा राईस तयार आहे‌.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes