खान्देशी उडीद वडे (khandeshi udid wade recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#KS4 #खान्देशी_रेसिपीज #खान्देशी _उडीद_वडे... खानदेशामध्ये भौगोलिक परिस्थितीला अनुसरून डाळींचे पिक हे जास्त प्रमाणावर येते किंवा घेतले जाते या डाळींपैकीच एक महत्त्वाची डाळ म्हणजे उडीद डाळ किंवा काळे उडीद ..याचं भरपूर प्रमाणावर खानदेशामध्ये पीक घेतलं जातं.. साहाजिकच या प्रोटीन पावर पॅक उडदाच्या डाळीचे वेगवेगळे पदार्थ आहारात समाविष्ट केले जातात.. आपल्याला उडदाच्या डाळीचा मेदू वडा फक्त माहित आहे जो साउथ ला बनवला जातो परंतु खानदेशामध्ये देखील या उडदाच्या डाळीपासून बडीशेप जीरे वाटून घातलेले उडदाच्या डाळीचे चमचमीत वडे हा देखील एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे .चला तर मग खानदेशातील फार जुना म्हणजे 1000 ते चौदाशे वर्षांपूर्वीचा अस्तित्वात आलेला लेवा पाटील या क्षत्रिय, मेहनती ,कामसूपणामुळे श्रीमंत बनलेल्या समाजाने उडदाच्या डाळीचा उपयोग करून खानदेशी उडीद वडे तयार केलेत... ते कसे केलेत ते आता आपण पाहू या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनीटे
4जणांना
  1. 1 कपउडीद डाळ
  2. 1 टीस्पूनजीरे
  3. 1 टीस्पूनबडीशोप
  4. 7-8हिरव्या मिरच्या
  5. 1 इंचआले
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चिमूटभरहिंग
  9. कोथिंबीर बारीक चिरलेली
  10. मीठ चवी नुसार

कुकिंग सूचना

25-30 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या नंतर उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यात 6-7 तास भिजवून घ्यावी.मग त्यातलं पाणी चाळणीत काढून निथळून घ्या, मग मिक्सर च्या भांड्यात पाणी न घालता बारीक वाटून घ्या.

  2. 2

    नंतर मिक्सरच्या भांड्यात आलं, मिरची, जीरे, बडीशोप वाटून घ्यावी.

  3. 3

    आता वाटलेल्या पिठात बारीक केलेला मसाला घालून, तिखट, हळद, मीठ, हिंग, कोथिंबीर घालून पीठ छान फेटून घ्या..

  4. 4

    नंतर ताटाला प्लास्टिक ची पिशवी लावून त्यावर तयार पिठाचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून वडे थापून घ्यावेत.

  5. 5

    आता गरम तेलात अलगद वडे सोडून दोन्ही बाजूने तळून घ्यावेत.

  6. 6

    तयार झाले आपले खानदेश स्पेशल उडदाचे वडे हे उडदाचे वडे दही,गव्हाची खीर याबरोबर सर्व्ह करा.. मी इथे उडदाचे वडे माझ्या मुलांना आवडतात सॉसबरोबर सर्व्ह केले आहे

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes