मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)

वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे.
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
वांगी धुवून घ्यवी,वांग्याचे मधोमध चार कप करावे व पाण्यात भिजत ठेवावी,तीळ, खोबरं, शेगडणे, खसखस, कढई मध्ये कोरडे भाजून घ्यावे,आता गार झाल्यावर त्यात लसूण पाकळ्या, आल व भरपूर कोथिंबीर, टोमॅटोघालून त्याचे बारीक वाटून घ्यावे.
- 2
आता फोडणीसाठी तेल तापत ठेवावे व त्यांत तेल शक्यतो शेगदने घ्यावे म्हणजे भाजीला अजून चव येते. तेल ताल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता, वरील वाटण घालावे, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे,तेल सुटायला लागलं की त्यात लाल तिखट, हळद, धने पूड,जिर पुड, गोडा मसाला घालून परतावे व थोड पाणी घालूव.
- 3
मसाला परत्यावर त्यात वांगी घालावी व पाच मिनिट झाकण ठेवावे,वांगी मऊ पडायला लागल्यावर त्यात गरम पाणी घालून झाकण ठेवून 10मिनिट शिजु द्यावे
भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ व थोडासा गुळाचा खडा घालावा हवा असल्यास थोडा गरम मसाला घालावा
आता आपली मसाला वांगी रेडी आहे - 4
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या