काळं मटण (Kala Mutton recipe in marathi)

*साखरेसंग तिखटाची चव चाखाया....*
*आहे का आतूर कुणी....*
*चला तर मग फिराया....*
*माज्यासंग लातूर-परभणी....*
महाराष्ट्रातील *शुगर बेल्ट* म्हणून प्रसिद्ध असलेले...
मराठवाड्यातील, लातूर-परभणी जिल्हे... उस, साखर, गुळ, काकवी याकरता जितके फेमस.... तितकेच, मटण-भाकरी या मेजवानीतही अग्रेसर....
धुळवड आसो, लगीन-हळदीचा कल्ला आसो, कि... गोंधळाचा उत्सव.... इतं...*काळं मटण* आनं *ज्वारीची भाकर* या लई झ्याकं मेजवानीवर ताव मारल्याबिगर मज्जा नाय बगा...
मगं चला कि,.... बिगी बिगी.... मोबिल का काय त्यो म्हनत्यात... त्यो घ्या बरं.... आनं... बनवा कि, रव्यारच्याला काळ्या मटणाचा बेत.... लयं खुस व्हत्यात कि नाय बगा समद्या घरची माणसं.... 😊👍🏽
©Supriya Vartak-Mohite

कुकिंग सूचना
- 1
मटण स्वच्छ धुवून ठेवणे. काळं वाटण तयार करण्यासाठी प्रथम चित्रात दाखवल्याप्रमाणे खोबऱ्याची वाटी आणि सालासकट कांदे खरपूस भाजून घ्यावे.
- 2
भाजलेले खोबरं आणि कांदे थंड झाल्यावर, कांदे सोलून कापून घ्यावे व खोबऱ्याचे बारीक तुकडे करावे.
आता कांदे, खोबरं, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरमधून वाटून घ्यावे.
- 3
वाटण तयार करण्याआधी, मटण शिजवताना, प्रथम एका कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद व चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे.
कांदा थोडा मऊ झाला की त्यात, मटण आणि कोमट पाणी घालून साधारणतः ७-८ शिट्ट्या घ्याव्यात. - 4
मटण शिजून तयार ठेवावे.
(टीप: मटण मऊ शिजण्यासाठी, कुकरमध्ये नारळाच्या करवंटीचा एक तुकडा ठेवावा)
- 5
आता आपले मटण आणि वाटण तयार आहे, तर काळं मटण बनवण्यासाठी एका कढईत तेल गरम करुन त्यात वाटण, लाल तिखट आणि काळा गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे.
छान मसाल्याचा दाट रंग आला पाहिजे.
- 6
आता एका मातीच्या भांड्यात /हंडीत, २ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात, शेकलेलं काळं वाटण घालून १-२ मिनीटे परतून घ्यावे. नंतर त्यात कुकरमध्ये शिजवलेले मटण घालून गरज असल्यास गरम पाणी व मीठ घालून साधारणतः ७-८ मिनीटे मंद आचेवर रस्सा उकळू द्यावा.
- 7
मटणाला मस्त तेलाचा तवंग सुटला कि, गॅस बंद करुन २-३ मिनीटे झाकून ठेवावे आणि नंतर कोथिंबीर गार्निश करुन गरमागरम ज्वारी, बाजरी किंवा कोणत्याही भाकरी सोबत सर्व्ह करावे.
झणझणीत काळं मटण तयार... 🥰😋
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चिकन शेजवान फ्राइड राइस (chicken Schezwan fried rice recipe in marathi)
- मराठवाडा स्पेशल ज्वारीचे थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
- पंगतीमधील वांगेबटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
- शेंगोळे मराठवाडा स्पेशल (shengole recipe in marathi)
- खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

टिप्पण्या