धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते

धिरडे व आंबरस (dhirde aamras recipe in marathi)

#KS5 मराठवाड्यातील ऐक पारंपारीक पदार्थ उन्हाळ्यात व आंब्याच्या सिझनमध्ये घरोघरी केला जाणारा तिखट गोड सगळ्यांच्या आवडीचा मेनु पातळ जाळीदार धिरडे व थंडगार आंबरस चला तर हि रेसिपी तुम्हाला दाखवते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. २५ ग्रॅम गव्हाचे पिठ
  2. २५ ग्रॅम तांदळाचे पिठ
  3. 3मिरच्या
  4. 6-7लसुण पाकळ्या
  5. 1/2 इंचआल
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1 पिंचहिंग
  9. 1-2 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबिर
  10. चविनुसारमीठ
  11. 1-2 टेबलस्पुनतेल
  12. १०० ग्रॅम आंबरस
  13. २०० ग्रॅम ज्वारीचे पिठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    धिरडे करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य बाउल मध्ये काढुन ठेवा पिठात हळद हिंग मीठ कोथिंबीर मिक्स करा

  2. 2

    मिरची लसुणआलं जिर्याची पेस्ट पिठात मिक्स करा तसेच छोट्या वाटी मधील पिठेही मिक्स करा

  3. 3

    सर्व साहित्य मिक्स केल्या नंतर त्याचे पातळ बॅटर बनवण्यासाठी ४-१/२ कप पाणी मिक्स करा आवश्यक वाटल्यास आणखीन पाणी मिक्स करा थोड बॅटर टेस्ट करून आवश्यक वाटल्यास मिठही मिक्स करा

  4. 4

    डोसा पॅन गरम झाल्यावर सगळीकडे तेल पसरवुन पेपरने पॅन पुसुन घ्या व फास्ट गॅस करून त्यावर बॅटर चांगले ढवळुन पॅनमध्ये पसरवा थोड तेल बाजुने टाका व गॅस कमी करून २ मिनिटे झाकण ठेवा नंतर धिरडे उलटुन परत थोडे तेल टाकुन शिजवा

  5. 5

    अशा प्रकारे पॅनवर सगळी धिरडे करून घ्या

  6. 6

    गरमागरम धिरडे व थंडगार आंबरस बाऊलमध्ये ओतुन प्लेट मध्ये ठेवा व प्लेट सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes