बटाटे वडे (batate vade recipe in marathi)

"बटाटे वडे "
महाराष्ट्र भर अगदी कुठंही काना- कोपऱ्यात मिळणारी आपल्या जवळ जवळ सर्वांच्याच आयुष्यातील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे, "बटाटे वडे" नाही का....!!!
असं कोणीच नसेल ज्याने वडापाव चाखला नसेल...!!
मला आठवत शाळेत असताना दर शनिवारी शाळेचा अर्धा दिवस आणि डब्याला सुट्टी असायची, तेव्हा आई शाळेत जाताना आवर्जून हातात 1 रुपया द्यायची , आणि आज तुझा आवडता वडापाव खा म्हणायची... एक दिवस आई ला पण आराम आणि माझी तर धमाल...!!! अक्षरशः मधल्या सुट्टीची वाट बघायची, आता तर आठवड्यातून एकदा तरी हा वडा घरी बनतोच...😊😊
आता तर पावसाळा, आणि पावसाळी मेनू मध्ये बटाटे वडे अग्रस्थानी असतात नाही का...!!

कुकिंग सूचना
- 1
आधी एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, हिंग, आलं लसूण मिरची पेस्ट घालून खमंग फोडणी करून घ्या, त्या नंतर त्यात हळद चवीनुसार मीठ घालून मिक्स करा
- 2
आता त्यात उकडलेले बटाटे घालून एकजीव करा, आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या,मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या
- 3
आता एका बाउल मध्ये बेसन पीठ, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा, त्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर मिश्रण करून घ्या
(बाजूला वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा)
त्या मिश्रणात तयार बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे घोळवून घ्या - 4
आणि गरम तेलात सोडून घ्या, आणि वडे सोनेरी रंगावर तळून घ्या, आणि बाजूला किचन टॉवेल वर काढून घ्या
- 5
आता चटणी करूया, त्या करता, वडे तळताना राहिलेला चुरा एका मिक्सर च्या भांड्यात काढून घ्या,(मी उरलेलं बेसन पिठाचे मिश्रणाचे बुंदी करून घेतली आहे)
त्यात लसूण लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्या - 6
आणि मिक्सर मधून कोर्सली वाटून घ्या
- 7
गरमागरम "बटाटे वडे" तयार चटणीसोबत खायला तयार आहेत तळलेल्या मिरची सोबतसर्व्ह करा,पावा सोबत खाताना पण या चटणीसोबत खाऊ शकता भारी लागतात...👌👌
- 8
पाव घरी पण बनवू शकतो
(लिंक पहा)
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)