मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#dr
डाळ आपल्या अन्नातील एक मुख्य घटक आहे.हे स्टेपल फुड नाही तर मुख्य अन्न च आहे.डाळ खाल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात.डाळीत प्रोटीन्स तर असतातच पण कॅल्शियम,फॉस्फरस,आयर्न,मॅग्नेशियम व इतर मिनरल्स ही भरपुर प्रमाणात असतात,त्यामुळे शरीरातील कमतरता भरुन निघते.
तसेच तुर डाळीपेक्षा मुग डाळीचे वरण खाणे खुप चांगले.आणि ही पचायला ही हलकी असते,म्हणुन डॉक्टर्स ही लहांनांपासुन मोठ्यापर्यंत मुग डाळ खाण्याचा सल्ला देतात.तर अशा या पौष्टीक मुग डाळीच्या वरणाची रेसिपी पाहुया......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीपिवळी मुग डाळ
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 चमचेआलेलसुण पेस्ट
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1 चमचातिखट
  8. 1/4 चमचाहिंग
  9. 1/2 चमचाजीरे
  10. 1/2 चमचामोहरी
  11. मीठ चविनुसार
  12. तेल
  13. कोथिंबीर
  14. 1/2 चमचागोडा मसाला

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    प्रथम डाळ स्वच्छ धुवुन कुकर मधे शिजवुन घ्या.

  2. 2

    बाकीचे साहीत्य घ्या.कढईत तेल गरम करुन जीरे,मोहरी घाला,तडतडली की हिंग,कढीपत्ता,मिरची,आलेलसुण पेस्ट घालुन छान परता.

  3. 3

    आता कांदा,टोमॅटो घाला.परता.मग हळद,तिखट,गोडा मसाला घाला.शिजलेली मुग डाळ घाला.आवश्यकतेनुसार पाणी घाला.हे वरण घट्ट च छान लागते.त्यामुळे जास्त पाणी घालु नका.चविनुसार मीठ,थोडी साखर घाला.आणि वरण छान उकळु द्या.

  4. 4

    आता वरण छान उकळुन तयार आहे,वरुन कोथिंबीर घाला.

  5. 5

    मस्त गरम गरम मुगडाळीचे फोडणीचे वरण पोळी किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा.भाकरी सोबतही हे वरण छानच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes