मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी चौथी पाककृती मी सादर करत आहे - "मिसळ पाव".
ही आमची फॅमिली डिश म्हणतो आम्ही 😜 अगदी पिढीजात.. गौरी-गणपतीला सर्व एकत्र जमले की सकाळी नाष्टा बनवायला वेळ नसतो बायकांना, दुपारच्या जेवणाचीच डायरेक्ट तयारी सुरू होते. मग मिसळ आणि वडा पाव पार्सल आणला जातो. सकाळी यथेच्छ सह - नाष्टा होऊन पुढील दिवसाची सुरुवात होते आमची 😃 शिमग्यात आमच्याकडे पहाटे पालखी येते. देव भेटून गेला की आमची स्वारी "रसराज" किंवा "गोपाळ" कडे वळते 😋 तिथे मिसळपाव ठरलेला. मी महाराष्ट्र मधल्या ज्या ज्या भागांत राहिले आहे(सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, मुंबई) त्या सगळ्यांची थोडी थोडी style कॉपी करत आजची मिसळ पाव बनवली आहे. गोड मानून घ्यावी 🤗

कुकिंग सूचना
- 1
कट : कांदा कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे. २ हिरव्या तिखट मिरच्या, १ इंच आलं, ४-५ लसूण पाकळ्या यांची एकत्र पेस्ट करून घ्यावी. हिरवे वाटणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पाण्यात खळखळून निथळून ठेवायचे.
- 2
कुकर मध्ये ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हळद, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. फोडणी तडतडली की त्यावर मिरची-आलं-लसूण पेस्ट परतून घ्यायची. पेस्ट ला थोडं तेल सुटलं की त्यावर कांदा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा. मीठ घालायचं. हिरवे मटार परतून घ्यायचे.
- 3
थोडं जास्तीच पाणी घालून(कटासाठी) कुकर ला ३ शिट्या काढून शिजवून घ्यायचे.
- 4
मिसळ मसाला : कढई गरम करून त्यावर सुक्या लाल मिरच्या, दालचिनी, मोहरी, साधं जिरं, शहाजीरे, मेथी दाणे, धणे, तिरफळ, काळी वेलची, हिरव्या वेलची चे दाणे, पांढरे तीळ एकत्र परतून घ्यायचे. मसाल्यांचा सुगंध पसरला की गॅस बंद करून खसखस घालायचं. खसखस आधी ऍड केलं तर ते लवकर भाजून लाल -काळ पडू शकत. सर्व ऐवज थंड झाला की मिक्सर ला बारीक करून ठेवून द्यायचं. ताज्या मसाल्याची मिसळ ला छान चव येते.
- 5
रस्सा : कढईत तेल गरम करून कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा. त्यावर तयार केलेला मिसळ मसाला, वाटल्यास गोडा मसाला, १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची. काश्मीरी पावडर ने रंग छान चढेल. तेल सुटेपर्यंत परतायचं.
- 6
कटासाठी तयार केलेले हिरवे वाटण्याचे सर्व मिश्रण या मसाल्यावर ओतायचे. गरजेनुसार गरम पाणी घालायचे. गरम पाण्यामुळे तर्री छान सुटते. झाकण ठेवून शिजू द्यायचे. मिश्रण उकळले की वर लालचुटुक तेल - मसाल्याची तर्री दिसू लागेल. मिठाचं प्रमाण एकदा चेक करून घ्यायचं. उसळ शिजली की गॅस बंद करून झाकून ठेवायचं.
- 7
बटाटा भाजी साठी आधी पाककृती सादर केली होती त्याची लिंक देत आहे.
- 8
कांदे पोह्यांसाठी आधी पाककृती सादर केली होती त्याची लिंक देत आहे.
- 9
उसळीवर आलेली तरी वेगळी काढून ठेवायची.
तयार मिसळ लादी पाव सोबत खायला घ्यायची. - 10
सर्व्ह करण्याची पद्धत : एका डिश मध्ये बटाट्याची भाजी एक चमचा घ्यायची. त्यावर एक चमचा कांदे पोहे घालायचे. मग त्यावर उसळ, लिंबाचा रस, फरसाण / चिवडा / शेव, चिरलेला कांदा, तर्री, दही, कोथिंबीर असं एकावर एक घ्यायचं. मग सगळं चमच्याने मिक्स करून पावासोबत आस्वाद घ्यायचा. सोबत ताक असल्यास उत्तम 😉
~ सुप्रिया घुडे
लिंक्ड रेसिपीस
कूकस्नप्स
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चिकन तंदूरी बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
- चॉकलेट कुकीज मकरून्स (chocolate cookies macrons recipe in marathi)
- पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
- व्हेज स्मोकी बिर्याणी (veg smoky biryani recipe in marathi)
- चमचमीत अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)

टिप्पण्या (5)