आलुबोंडा (aloo bonda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून सोलून,कापून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून,मोहरी,हिंग, कढीपत्ता हळद हिरवी मिरचीची भरड घालून मिक्स करून घ्यावे. नंतर बटाट्याचे काप आणि प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. वरून कोथिंबीर घालावा तयार आहे आपली बटाट्याची भाजी.
- 2
भज्याच्या पिठाप्रमाणे बेसन भिजवून घ्यावे. त्यामध्ये हळद, तिखट, ओवा, जीरे, प्रमाणात मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. एक चमचा कडकडीत तेल आणि एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालून परत मिश्रण मिक्स करून घ्यावे. आणि आलू च्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यावे.
- 3
गॅसवर कडकडीत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर हे वडे घालावे आणि मंद आचेवर तळून घ्यावे.
- 4
खाण्यासाठी तयार आहे, आपला गरमागरम आलुबोंडा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मूग डाळ हलवा प्रीमिक्स (moong dal halwa premix recipe in marathi)
- लेफ्ट ओवर इडली वडा (leftover idli vada recipe in marathi)
- साजूक तुपातला मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
- मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
- पुदिना चटणी (रेस्टॉरंट स्टाईल) (pudina chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15205677










टिप्पण्या