हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

सर्वांची आवडती हाक्का नूडल्स आज रक्षाबंधनाच्या निमित्त घरी ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी बनविली..
हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
सर्वांची आवडती हाक्का नूडल्स आज रक्षाबंधनाच्या निमित्त घरी ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी बनविली..
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडे तेलाचे थेंब टाकून नूडल्स ८० टक्के शिजवून घ्यावी.
- 2
नूडल्स शिजल्यावर ती चाळणीत काढून त्यावर पाणी घालून मोकळी करून घ्यावी
- 3
सर्व भाज्या उभ्या कापून घ्याव्यात. लसूण बारीक चिरून घ्यावा
- 4
एका भांड्यात थोडे तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये आधी लसूण हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या घालाव्यात नंतर सर्व भाज्या घालून एकजीव करावे. भाज्या जास्त शिजवू नये अर्धा मिनिट शिजवावे
- 5
त्यामध्ये सोया सॉस, व्हिनेगर, चिली सॉस व चींग हाका नूडल्स मसाला घालावा अगदी किंचित मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करावे.
- 6
वरील भाज्यांमध्ये नूडल्स घालून पुन्हा एकजीव करावे. थोडी वाफ घेऊन गॅस बंद करावा. वरून कांद्याची पात घालावी.
- 7
अशाप्रकारे हे हक्का नूडल्स गरमागरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या