भोपळ घाऱ्या (bhopla gharya recipe in marathi)

#ngnr भोपळा गावी भरपूर प्रमाणात मिळतो. कधी गावाहून भोपळा आणलाच तर भोपळ घाऱ्या ह्या हमखास घरी बनवल्या जातात आणि सर्व जण आवडीने खातात.
भोपळ घाऱ्या (bhopla gharya recipe in marathi)
#ngnr भोपळा गावी भरपूर प्रमाणात मिळतो. कधी गावाहून भोपळा आणलाच तर भोपळ घाऱ्या ह्या हमखास घरी बनवल्या जातात आणि सर्व जण आवडीने खातात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका टोपा मध्ये किसलेला भोपळा घेऊन तो शिजत ठेवावा.थोडा शिजल्यावर त्यात गुळ घालावा. थोडेसे मीठ घालावे आणि भोपळ्याचे पाणी आणि गूळ यामध्ये व्यवस्थित भोपळा शिजवून द्यावा.नंतर त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावे.
- 2
भोपळा शिजल्यानंतर एका भांड्यात काढून थोडे थंड होऊ द्यावे.नंतर त्या भोपळा मध्ये जेवढे पीठ बसेल गव्हाचे तेवढे घालून गोळा मळून घ्यावा.
- 3
एका कढईत तेल तापत ठेवावे.आता पीठाचे छोटे छोटे गोळे करावे आणि पुरीसारखे लाटावे. लाटलेली पुरी तेलामध्ये तळून घ्यावे.
- 4
तयार भोपळ घाऱ्या गरम किंवा थंड सर्व्ह करावे.भोपळ घाऱ्या बरोबर लाल शेंगदाण्याची मिरची खूप छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या