चिजी फोडणीचा ब्रेड (cheese phodnicha bread recipe in marathi)

#Charushila_prabhu ताईंची फोडणीचा ब्रेड ही रेसिपी मी थोडा बदल करुन Cooksnap केली. फारच छान टेस्टी झाली. रोजच्या जेवणात जरा बदल म्हणून आणि भुकेसाठी झटपट होणारा असा हा फोडणीचा ब्रेड नाश्त्याला तसेच कधी तरी लंच किंवा डिनर साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे. गरमागरम फोडणीच्या ब्रेड वर चिझ किसून घातले की एकदम भन्नाट टेस्टी लागले.

कुकिंग सूचना
- 1
ब्रेडचे बारीक तुकडे करुन घ्यावे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्यावा.
- 2
कढई मधे तेल गरम झाल्यावर त्यात फोडणी साठी मोहरी जीरे तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतावा. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे नंतर त्यात घरगुती मसाला, हळद, मीठ घालून मिक्स करावे.
- 3
त्यात बारीक केलेले ब्रेडचे तुकडे घालून चांगले मिक्स करावे आणि दोन मिनिटे झाकून वाफ काढावी. मस्त टेस्टी फोडणीचा ब्रेड तयार आहे.
- 4
एका प्लेटमधे मस्त टेस्टी गरमागरम फोडणीचा ब्रेड घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिझ किसून घालून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या