बटाट्याची भाजी
#HLR
# बटाटा भाजी
बटाटा म्हटलं आपल्या स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक. कारण भरपूर प्रमाणात खूप सार्या रेसिपी मध्ये बटाट्याचा वापर केला जातो. तसेच बटाटा पासून बनलेले आईटम लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतं. फक्त पारंपारिक पदार्थच नाही, तर नवनवीन इनोव्हेटिव्ह डिश मध्ये देखील बटाटा हा घटक वापरला जातो. तो पण मेन घटक म्हणून. बटाट्याचं आणि स्वयंपाकात अविभाज्य नात आहे म्हणण्यास काही हरकत नाही.
आज मी बटाटा उकडून बटाट्याची सुकी भाजी बनवत आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन. कुकर मध्ये थोडेसे पाणी घालून चार ते पाच शिट्टी घेऊन उकळून घ्या.
- 2
एक मोठा कांदा व हिरवी मिरची कट करून घ्या. बटाटे थंड झाल्यावर साल काढून घ्या.
- 3
आता एका पॅन मधे तेल टाका. तेल गरम झाल्यावर हिंग, जिरे, मोहरी घाला. त्यानंतर कांदा बारीक हिरवी मिरची घालून. चांगले फ्राय होऊ द्या.
- 4
कांदा फ्राय झाल्यावर त्यामध्ये उकडून बारीक कट केलेले, बटाटे टाका. पाव टीस्पून हळद, एक टीस्पून मीठ टाका.
- 5
भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे बटाट्याची सुकी पिवळी भाजी.
- 6
ही बटाट्याची सुकी भाजी चपाती,डोसा बरोबर खातात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या