झणझणीत पावभाजी आणि शेवयांची दाट गोड खीर (pav bhaji recipe in marathi)

#CDY
#बालदिन_विशेष_रेसिपी_चॅलेंज
#झणझणीत_पावभाजी_आणि_शेवयांची_दाट_गोड_खीर
बालदिन साजरा करताना मला मुलांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या धमाल गोष्टी आठवताना मन हळवं झालं होतं. कोणतीही मुलं लहान असो वा मोठी खाण्याचा बाबतीत भारी चोखंदळ असतात. रोजचं छान जेवण मुलांना कधी साधं वाटतं तर कधी तेच चमचमीत लागतं. कधी गोड, कधी तिखट तर कधी अगदी हाॅटेल मधल्या चवी प्रमाणे पदार्थ कर सांगतात. तसं माझ्या मुलांना व्हेज, नॉनव्हेज सगळंच आवडतं, विशेष खाण्याचे नखरे नसतात तरी हे कर, ते कर म्हणून डिमांड मात्र असतात. आम्ही दोघे भावंडं पण लहानपणी अशीच होतो. ते बालपण आठवत, सगळ्यांच्या आवडीची फेवरेट " झणझणीत पावभाजी" बनवली आणि त्याचबरोबर "शेवयांची दाट गोड खीर" पण बनवली. या गोड पदार्थाने लज्जत आणखीनच वाढली. आणि लहानपणीच्या गोड आठवणी काढत काढत खाण्याचा आस्वाद घेत "बालदिन" साजरा केला.

कुकिंग सूचना
- 1
फ्लॉवर बटाटे उकडून घेतले. कांदा, सिमला मिरची बारीक चिरून ठेवली आणि टोमॅटोची प्युरी करून ठेवली.
- 2
कढई मधे तेल आणि बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतले. मग त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची आणि किसलेले बिट घालून परतले.
- 3
मग परतलेल्या कांद्यामधे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतले.
- 4
नंतर पावभाजी मसाला, तिखट पूड, धणे जीरे पावडर, हळद, मीठ घालून मिक्स करुन त्यात उकडलेल्या भाज्या स्मॅश करुन घातल्या. आणि भाज्या उकडलल्या त्यातले पाणी पण घातले.
- 5
पावभाजी जरा वेळ परतून घेतली आणि त्यात बटर घातले. गरमागरम पावभाजीचा मस्त सुगंध घरभर दरवळत होता.
- 6
गरमागरम पावभाजी बरोबर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि बटर मधे रोस्ट केलेले गरमागरम पाव प्लेटमधे वाढून सर्व्ह केले. आम्ही सगळ्यांनी बालपणीच्या आठवणी काढत काढत मुलांची आणि आमची सगळ्यांची फेवरेट पावभाजी खाण्याचा आस्वाद घेतला. आणि सगळ्यांच्या आवडीची "शेवयांची दाट खीर" ह्या गोड पदार्थाच्या सोबतीने बालदिन साजरा केला.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या