कोल्हापुरी काळे मटण थाळी (kale mutton thali recipe in marathi)

कोल्हापुरी काळे मटण थाळी (kale mutton thali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन त्यात हळद, मीठ आणि दही घालून साधारण तासभर मॅरीनेट होऊ द्या...
- 2
हिरव्या वाटणा चे घटक मिक्सर मधून बारीक दळून घ्या... आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घाला...
- 3
प्रेशर कुकर मध्ये मॅरीनेट केलेले मटण, हिरवं वाटण आणि साधारण लिटर भर पाणी घालून, झाकण लावून मंद गॅसवर पंचवीस मिनिटे मटण शिजवून घ्या... शिट्टी होऊ देऊ नका... शिजलेलं मटण आणि मटण स्टॉक वेगळा करा...
- 4
काळ वाटण बनवण्यासाठी कांदा आणि खोबरं डायरेक्ट फ्लेम वर संपूर्ण बाहेरून काळा होईपर्यंत भाजून घ्या... मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याचे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घाला... त्यात कोथिंबीर, लसूण, आल आणि हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या... आवश्यकता वाटल्यास वाटताना पाणी घाला...
- 5
लोखंडी भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरची पावडर आणि काळा मसाला घाला... मग त्यात काळ वाटण बाजूने तेल सुटेपर्यंत आणि रंग काळपट होईपर्यंत शिजवून घ्या... तेलाचे प्रमाण नेहमीपेक्षा थोडे जास्त घ्यावे...
- 6
आळणी सूप बनवण्यासाठी मटण स्टॉक मधला अर्धा भाग किंवा तुम्हाला हवा तेवढा भाग बाजूला करून घ्या... मग त्यात आल्याचे तुकडे, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची, साजूक तूप आणि कोथिंबीर घाला... सात ते आठ मिनिटे उकळी काढून घ्या... आपली आळणी तयार आहे... मीठ तपासून आवश्यकता वाटली तर घालावे...
- 7
मटण रस्सा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घालून त्यामध्ये आधी भाजलेला काळा मसाला वाटण घाला... रसा किती हवा ह्या प्रमाणात वाटण्याचे प्रमाण कमी जास्त करावे... मग त्यात मटण स्टॉक मधील आवश्यक तेवढा स्टॉक घाला... व्यवस्थित उकळी येऊ द्या... चव घेऊन मीठ घाला... आवडत असेल तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला... आपलं मटण रस्सा तयार आहे... तुम्हाला हवं असल्यास शिजलेल्या मटणाचे थोडे तुकडे घालू शकता...
- 8
काळा मटण बनवण्यासाठी भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या... कांदा सॉफ्ट झाल्यानंतर त्यात आधी शिजवलेलं काळा मसाला वाटण घाला... राहिलेले सर्व... मग त्यात शिजवलेले मटण घालून व्यवस्थित मिसळून घ्या... खूप ड्राय वाटत असेल तर मटण स्टॉक मिसळा... योग्य कन्सिस्टन्सी ची ग्रेव्ही तयार झाली की गॅस बंद करा... आपला काळ मटण तयार आहे...
- 9
गरम गरम भाकरी, सोबत कांदा आणि हे मटण म्हणजे अगदी रॉयल बेत...
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes







टिप्पण्या