मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#EB1 #W 1
तसे बघायला गेले तर हल्ली आपल्याला बाराही महिने उपलब्ध असते.परंतु हिवाळ्यामध्ये तिचे रुपडे काही वेगळेच दिसते अगदी लुसलुशीत ,हिरवीगार ,कोवळी अशी मेथी आपल्याला फक्त हिवाळ्यातच पाहायला मिळते.हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात खूपच महत्त्व आहे. परंतु मेथी खायला थोडी कडसर लागते त्यामुळे मुले मेथी खात नाहीत परंतु याच मेथीचा जर पराठा केला तर तो मुले अगदी आवडीने मिटक्या मारत खातात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

कुकिंग सूचना
- 1
अगोदर मेथीची भाजी निवडून धुऊन कोरडी करून घेणे आणि लागणारे साहित्य जमवून घेणे
- 2
आता सर्व पीठ एकत्र करून मध्ये बारीक चिरलेली मेथी आणि वरील सर्व मसाले लसुन,मीठ आणि जीरे खलबत्त्यामध्ये कुठून घालने व दही घालून सर्व नीट मिक्स करून घेणे आणि लागेल तसे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेणे.वरतून 1 चमचा तेल लाऊन 1/2 तास ठेवणे.
- 3
आता मळलेल्या पिठाचा लिंबू पेक्षा मोठा गोळा घेऊन पिठाचा हात लावून थोडे लाटून घेणे.आता त्याला तेलाचा हात लाऊन त्याची घडी करणे.
- 4
आता त्याचा थोडासा जाडसर पराठा लाटून घेणे पाणी गरम तव्यावर दोन्ही बाजूने शेकून तेल किंवा तूप लावून भाजून घेणे.
- 5
गरमागरम मेथी पराठा दही शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्या बरोबर सर्व करावा. थंड किंव्हा गरम कसाही छानच लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
- खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
- भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
- शेव टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
- बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

टिप्पण्या (2)