आचारी पनीर फ्राय (achari paneer fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मसाल्याचे सर्व घटक मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या... मग मिक्सर मधून दरदरित वाटून घ्या...
- 2
दह्यामध्ये लाल तिखट, किचन किंग मसाला, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिसळा... तिखट किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार मसाला चे प्रमाण कमी जास्त करा... त्यात पनीर मिसळून घ्या... पनीर वर कसुरी मेथी हाताने चुरुन घाला...
- 3
मग त्यात कलौंजी आणि वर दळलेला मसाला घाला... सर्व व्यवस्थित मिसळून पंधरा ते वीस मिनिटं मॅरीनेट होऊ द्या... आवडत असेल तर चिमुटभर साखर घाला...
- 4
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पनीर फ्राय करून घ्या... पनीर जोडीला राईचे तेल जास्त चांगले लागते... पण आवडत नसेल तर कोणतेही दुसरे तेल वापरू शकता...
- 5
आपलं आचारी पनीर फ्राय तयार आहे... हे तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता, रोल मध्ये वापरू शकता, किंवा पनीर सॅंडविच बनवू शकता, किंवा भाजी म्हणूनही खाऊ शकता... चव मात्र खूप छान होतं...
Keywords
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या (2)