आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)

Vasudha Gudhe @vasudha_sg
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕
कुकिंग सूचना
- 1
आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यावे व त्याचे छोटे छोटे काप करून घ्यावेत
- 2
पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालावे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालावी. चण्याची डाळ, उडदाची डाळ, मेथी दाना, कढीपत्ता, हिंग घालून एक ते दोन मिनिटे परतून घ्यावे. त्यामध्येच आता आवळ्याचे केलेले काप घालून एक वाफ काढून घ्यावी.
- 3
आता या वाफवलेल्या आवळ्यामध्ये गूळ, लिंबाचा रस व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. व थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉट मध्ये याची स्मुद चटणी वाटून घ्यावी.
- 4
तयार आहे आपली आवळ्याची चटपटीत, तिखट, गोड, आंबट अशी चटणी...
तेव्हा नक्की ट्राय करा आवळ्याची चटणी.. 💃 💕 - 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15743703













टिप्पण्या