तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Poonam Pandav @poonam_1984
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तीळ कढई किंवा पॅन मध्ये भाजून घ्या.तीळ भाजतांना हाथाने पाण्याचा थोडासा हबका मारा. म्हणजे तीळ छान खमंग भाजले जातात. तीळ छान भाजले कि एका ताटात ते काढून घ्या.
- 2
नंतर त्याच कढई मध्ये शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप सुद्धा भाजून घ्या.
- 3
भाजेलेलं साहित्य एका ताटात घेऊन थंड करून घ्या. साहित्य थंड झालं कि मिक्सर च्या भांड्यात भाजेलेलं तीळ, शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप घ्या. लसूण ऍड करा.चवीनुसार मीठ घाला. लाल तिखट घाला. आणि मिक्सरला सर्व साहित्य भडसर वाटून घ्या.
- 4
आपली खमंग तिळाची चटणी तयात आहे. ही चटणी वरण भात, चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15817734













टिप्पण्या