नाचणी सत्व (Nachni Satva Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#EB5#W5
नाचणी चं महत्व शरीरासाठी कीती आवश्यक आहे हे आता सर्वांना पटु लागलंय. गोव्यात तर नाचणी सत्व,भाकरी,पेज नेहमीच केले जाते.लहान मुलांना तर हमखास पेज पाजतात. हाङं बळकट व्हावी म्हणून. आता बघुया गोवन पद्धतीने नाचणी सत्व. काही जणं त्याला दुधाळी पण म्हणतात.
#EB5 #W5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार
  1. 2 वाट्यानाचणी रात्री भिजत टाकायची
  2. 1नारळाचं खोबरं
  3. 1 वाटीगुळ बारीक चीरून
  4. 1 चमचावेलची पावङर
  5. काजु व तीळ आवङीप्रमाणे मीठ पाव चमचा,साजुक तूप थाळा ग्रीस करण्यास

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    भिजवलेली नाचणी दोन तीनदा मिक्सरला लाऊन त्याचे सत्व गाळून घ्यावे.

  2. 2

    ओलं खोबरं पण मिक्सरला फीरऊन त्याचाही रसं काढुन घ्या.

  3. 3

    नाचणी चे सत्व भांङ्यात खाली बसेल व वर पाणी येईल ते काढुन ऊरलेल्या सत्वात नारळाचे दुध व गुळ हाताने नीट मिक्स करावे.

  4. 4

    सर्व मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेऊन सतत ढवळत रहावे.हळुहळु ते घट्ट होऊ लागते. मग मीठ,वेलची पावङर,काजु,तीळ घालुन मंद आचेवर सतत दहा मिनिटे हलवंत रहावे.

  5. 5

    आता मिश्रण व्यवस्थित घट्ट होईल तेव्हा थाळ्याला तुप लाऊन मिश्रण त्यात ओतुन तीन तास सेट होऊ द्यावे.

  6. 6

    नंतर वङ्या कापुन फ्रीजमध्ये ठेऊन दोन तासांनी सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes