मटार ऊसळ (matar usal recipe in marathi)

#EB6 #W6
बाहेर मस्त थंडी सगळीकडे ताज्या हिरव्यागार भाज्यांचे स्टाॅल बघून काय घ्याव आणि काय नाही अस होत खरतर पण मग नजर थांबते ती ताज्या हिरव्यागार मटार वर मग भरपूर मटार आणून त्याच सोलायच कीचकट काम करून अगदी मनात लीस्ट तयार असते आपली काय काय पदार्थ करायचे ह्याची 😊😀.कचोरी, हमस हे पदार्थ झालेत माझे करून पण आपली नेहमीची मटार ऊसळ राहिलीच होती मग आज लागलाच मुहूर्त😍
तर साधी हिरव्या वाटणातली ही मटार ऊसळ आणि बरोबर बटर लावून भाजलेला ब्रेड असेल तर सुटसुटीत स्वयंपाकही होतो आणि थंडीचा गरमागरम बेत ही सार्थकी लागतो😊😋

कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर,पुदिना,पालक,हिरवी मिरची,लसुण,आल व कांदा मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावे. लगल्यास थोडेसे पाणी घालावे.
- 2
आता कढईत तेल घालून तेल तापल्यावर त्यात जीरे घालून लगेच हिरवा मसाला घालावा. मीठ व गरम मसाला घालून परतून लगेच पाणी घालावे म्हणजे रंग हिरवाच राहतो.
- 3
रस्सा ऊकळायला लागला की लगेच ताजे मटारचे दाणे घालून एक ऊकळी आणावी आपली मटार ऊसळ तयार आहे.
- 4
सर्व्ह करतना गरमागरम मटार ऊसळ बटर लावून भाजलेल्या गरमागरम ब्रेड बरबर सर्व्ह करावी.
#EB4 #W6
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)